Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू...!*

*हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस हवालदाराचा मृत्यू…!*

2121 इन254*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंथनवार कुटुंबांची सांत्वन….!*

अहेरी : गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार (४९) यांचे काल २८ फेब्रुवारी ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.संतोषअण्णा मंथनवार हे अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी होते.काल सकाळी ते गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर होते.साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

त्यांना गॅरापत्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंथनवार हे पूर्वी आलापल्ली येथे कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचे.त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुःख निधनची विषय आलापल्ली,अहेरीतील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी आलापल्ली येथे जाऊन येथील मृत्यूक मंथनवार परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवारसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज