Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले सोयाम कुटुंबाला औषध उपचारकरिता आर्थिक मदत...!*

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले सोयाम कुटुंबाला औषध उपचारकरिता आर्थिक मदत…!*

अहेरी :तालुक्यातील टेकमपल्ली येथील रहिवासी कांता दिलीप सोयाम ही कॉन्सरग्रस्त असून एम्स हॉस्पिटल नागपूर येथे जाऊन उपचार घेण्यासाठी तीला अडचण भासत आहे.काल तिच्या पती दिलीप सोयाम काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन तिच्या प्रकृती बाबत माहिती दिले

अजय भाऊ कंकडालवार यांनी अडचण बघून त्यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत केले आहे.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे कॉन्सरग्रस्त पती दिलीप सोयाम यांना सांगितले.औषध उपचारासाठी आर्थिक मदत मिळल्याने दिलीप यांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आणि कंकडालवारांचे आभार मानले.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज