*गंगामातेची विधिवात पुजा अर्चना करून घेतली दर्शन….!*
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे ओडेवार समाजाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने उत्सहात गंगा देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.आज गंगा देवीची कार्यक्रमात काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक तथा माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार त्यांचे अर्धांगिनी,काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून गंगा देवीची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गंगा माता देवीकडे साकडे घातले व समस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख शांती व उत्तम आरोग्य लाभावे अशी गंगा माता देवीकडे प्रार्थना केले.तसेच त्यावेळी ओडेवार समाज कडून अजय कंकडालवार यांचे स्वागत करण्यात आली आहे.
यावेळी वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,हरिष गावडे उपसरपंच देवलमारी,संजय पोरतेट माजी उपसरपंच, संदीप दुर्गे,जिवन दुर्गे,जगन दहगावकर,दिलीप मडावी,शामराव दुर्गे,किशोर तेलंगे,प्रल्हाद पेंदाम,रोशन सामालवार,साई पेंदाम बोडा येडगम,साई गौराराप,येर्रा गौरारप,बाबूराव पानेम,विलास पानेम परशुराम येडगम,मनोज पानेम, मधुकर आत्राम संपत गेडाम,अशोक आत्राम,निलेश आत्राम,बंडू गेडाम, सुरेश गेडाम, प्रमोद गोडसेलवार, लक्ष्मण आत्रामसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते व ओडेवार समाजाचे समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.