*भामरागड येथील नागरिकांची कंकडलवार यांच्या मार्फत खासदार डॉ.किरसान यांना निवेदन*
भामरागड : येथील सार्वजनिक स्मशानभूमी जवळ अद्याप कोणत्याही प्रकारचे सोयी- सुविधा करण्यात न आल्याने एखाद्या इसमाच्या मय्यतीच्या वेळी नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागतं आहे.
म्हणून भामरागड येथील नागरिकांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांची आज त्यांचा जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या मार्फतीन खासदार डॉ. किरसान यांना निवेदन पाठवून भामरागड येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत बांधकाम,शेड बांधकाम तसेच बोअरवेल खोदकामासाठी आणि मोहरम दर्गासाठी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
यावेळी अजय कंकडलवार यांनी भामरागड येथील ग्रामस्थांसोबत आस्थेने तालुक्यातील इतर समस्यांवर सुध्दा चर्चा करित आपले निवेदन खासदार डॉ.किरसान यांच्याकडे पाठपुरावा करून मोहरम दर्गा,स्मशानभूमी येथे आवश्यक सोयी सुविधेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडलवार यांना निवेदन देतांना भामरागड येथील शिवराम गुडीपाका,रवींद्र चिप्पाकुर्ती,सुनील गुडीपाका,रोहित गुडीपाका,विजय गुडीपाका,बंडू गुडीपाका,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,चुंटगुटाचे तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर ,नरेंद्र गर्गम, कार्तिक तोगाम,विनोद रामटेके, रवि भोयरसह आदी उपस्थित होते.