Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*काँग्रेसनेते कंकडालवार यांच्या कडून कोरेत परिवाराला आर्थिक मदत..!*

*काँग्रेसनेते कंकडालवार यांच्या कडून कोरेत परिवाराला आर्थिक मदत..!*

*इंदाराम येथील रहिवाशी लिंगा मल्ला कोरेत यांचे दुःखत निधन…!*

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील रहिवाशी लिंगा मल्ला कोरेत यांच दुःखत निधन झाले होते.अंत्यविधी कार्यक्रमातून कोरेत परिवार कसेबसे बाहेर पडले .मात्र पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमाला कोरेत कुटुंबाला अडचण भासत होती.

आज काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात कंकडालवार यांची भेट घेऊन परिस्थिती विषय सांगितले होते.कंकडालवारांनी कोरेत परिवाराची आर्थिक अडचण पाहत कोरेत कुटुंबाला तेरवी कार्यक्रम तसेच घरच्या इतर कामासाठी आर्थिक मदत केले.

यावेळी आर्थिक मदत करताना अजय कंकडालवार सोबत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समितीचे उपसभापती गीता चालूरकर,माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,इंदारामचे तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यप्रकाश पेंदाम,नरेंद्र गर्गम,कवडूजी चल्लावार,रज्जाक पठाणसह आदी उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज