*गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रभारी बेल्लई नाईक यांची : काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हणमंतू मडावी कडून स्वागत

0
31

गडचिरोली : चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रभारी बेल्लई नाईक यांनी आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते.दौऱ्या दरम्यान काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासकीय विश्रामगृह येथे बेल्लई नाईक यांची भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले आहे.

लोकसभा क्षेत्राचे प्रभारी नाईक यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अनेक विषयांवार चर्चा करण्यात आली आहे.त्यावेळी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सद्या असलेल्या राजकीय वातावरण बाबत सांगितले.तसेच जिल्ह्यातील विविध विषयांवार चर्चा केले.

यावेळी काँग्रेसनेते प्रज्वल नागूलवार,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,चंदू बेझलवार,स्वप्नील मडावी,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्यासह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here