*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी केली उपचारकरिता तलांडी परिवाराला आर्थिक मदत…!*

0
33

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तुमिरकसा येथील अजयभाऊ कंकडालवार यांचे कट्टर समर्थक दिवाकर तलांडे यांची बहीण सरिता जन्नू तलांडे ही काही दिवसांपासून आजारी असल्याने.तलांडे घरचा परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने सरिता तलांडी हिला नागपूर येथे एम्स ह्या खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तलांडे परिवाराला खूपच अडचण भासत होती.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांना अडचणीची माहिती मिळाली असता यांनी सरिता तलांडे यांना रूग्णालयात उपचारासाठी नागपुर येथे जाण्याकरिता आर्थिक मदत केले आहे.

यावेळी मदत करतांना मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,काँग्रेस नेते प्रज्वल नागूलवार,कसनसूरचे माजी सरपंच सुनील मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,काँग्रेसनेते अज्जूभैया पठाण, चंद्रकांत बेझलवार,स्वप्नील मडावी, नरेश गर्गम,अरफाज हुसेन,रज्जाक पठाण,अनिल इस्कापे,दिवाकर तलांडे,मारोती पेंदाम,बांगरू मडावी,धीरज मेश्राम,प्रवीण मेश्रामसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here