Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्रीगणरायाची महाआरती व महाप्रसादाचे...

*जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या इंदाराम येथील निवासस्थानी श्रीगणरायाची महाआरती व महाप्रसादाचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न*

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे बाप्पाचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला. यात विशेष म्हणजे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मूळ गाव असलेल्या इंदाराम येथे त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत असतात.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा इंदाराम येथे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली.आज इंदाराम येथे कंकडालवार परिवाराने श्रीगणरायांची विधिवत पूजा,महाआरती करून.महाप्रसादचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या महाप्रसाद कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो भाविक भक्तजण उपस्थित राहून श्रीगणरायाची दर्शन घेऊन महाआरतीत सहभाग होऊन तदनंतर महाप्रसादाची आस्वाद घेतले.

इंदाराम येथे आयोजित श्रीगणेशाची महाआरती,गोपाळकाला व महाप्रसाद कार्यक्रमाला आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,मातोश्री मंदाबाई कंकडालवार,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,स्मिता वैभव कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,रिध्वी कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गेसह परिसरातील नागरिक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज