Saturday, February 15, 2025
HomeUncategorized*नागपंचमी निमित्त माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागमंदिरात केली पूजा..!*

*नागपंचमी निमित्त माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नागमंदिरात केली पूजा..!*

अहेरी : तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गवरील नागमाता मंदिर देवस्थान येते नागपंचमी निमित्त हजारो भाविकांचा अलोट गर्दीने नागपंचमी मोठ्या उत्साहात पार पडला आहे.जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येऊन पूजा करतात.नागदेवता आणि शंकर भगवानची पूजा आणि अभिषेक करून दूध आणि मखाना यांचा नवैद्य अर्पण करतात.

नागपंचमी निमित्त आज काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी नागमातेच्या पूजा अर्चना करून दर्शन घेऊन.भाविकांना नागपंचमी निमित्त शुभेच्छा दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज