*अहेरी येथील बेकायदेशीर प्लाट्ससह दप्तर दिरंगाई विरुद्ध बेमुदत आंदोलन*
गडचिरोली : सर्वसामान्य नागरिकांकडून प्राप्त एखद्या तक्रारीवर विहित मुदतीत योग्य कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्या-त्या विभागाचे विभाग प्रमुखांना सुद्धा असतात. एखाद्या तक्रारीवर तब्बल 22 महिने उलटल्यानंतर सुद्धा संबंधीत विभागाकडून आपल्या चौकशीत दोषी सापडलेल्यांवर कोणतीच कारवाई न करता दप्तर दिरंगाई करत वेळकाढूपणा धोरण अवलंबनाऱ्यांविरुद्ध सर्वसामान्य जनतेला कठोर कारवाईची अपेक्षा असणे सहजिकच आहे.
अहेरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातल्या दफ्तराची खोडतोड करून सरकारी भूखंडाला मालकी हक्क दाखविणे,मृत व्यक्तीला जिवंत दाखविणे व जिवंत व्यक्तीला मृत दाखविणे असे प्रकरण सुरू होता.या प्रकरणासह ईतर अनेक नियमबाह्य कामांची रितसर चौकशी करून संबंधितांवर उचित कारवाईची मागणी मागील 22 महिन्यांपूर्वी येथील नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार यांनी पुराव्यांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिले.तक्रारीत नमूद दोषींवर विहित मुदतीत कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारून आंदोलनाला सुरुवात केले होते.
आंदोलना दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीत जे कोणी दोषी आढळून येणार त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्याची लेखी आश्वासन सुद्धा दिले होते.परंतु मागील 22 महिन्यांपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासन हवेत विरल्याने दोषींवर कारवाईची बडगा उगारण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण देण्याऱ्या दोषी अधिकाऱ्यांसह चौकशी समितीने दोषी ठरविलेल्यां विरुद्ध तात्काळ निष्पक्ष कठोर कारवाईची मागणी करत अहेरीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याची इशारा दिल्याने अहेरी येथील बेकायदेशीर भूखंड प्रकारण आता कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लागलेलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार व गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान साहेबांना दिलेल्या निवेदनात जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांनी एकूण सात मुद्यांच्या उल्लेख करीत दोषींविरुद्ध निष्पक्ष कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनातील नमूद प्रत्येक मुद्यांवर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास गडचिरोलीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 02 जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले आहे.आंदोलनाचे निवेदनाची प्रत त्यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक गडचिरोली यांना पाठविले आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी जर शून्य वेळेत का होईना पण सदर विषय सभागृहात उचलून धरल्यास या प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रक्षरित्या सहभाग असलेल्यांवर कारवाईची बडगा उगारण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून अजय कंकडालवार यांनी दिलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची इशाऱ्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण सुद्धा तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.