Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*व्येंकटरावपेठा येथील काणका देवी बोनालु कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती*

*व्येंकटरावपेठा येथील काणका देवी बोनालु कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती*

अहेरी : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील काणका दुर्गा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा व्येंकटरावपेठा येथे काणका दुर्गा देवीच्या बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

काणका दुर्गा बोनालू कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते,लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थिती दर्शवून देवीची दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी काणका दुर्गा देवी कडे प्रार्थना केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,ग्रामपंचायत सदस्य सौ.मिनाताई गर्गम,माजी ग्रामपंचायत उपसरपंच शामराव राऊत,पुजारी गणेश गेडाम,नरेंद्र गर्गम,शंकर सिडाम,माधव राऊत,रवी कुळमेथें,महेश दहागावकर,चिंटू आलाम,राजू सडमेक,निरंजना वेलादी,जनाबाई गेडाम,मंगुबाई चीलनकर, रेखाबाई सडमेक,वसंत गेडाम,संजू राऊत, रवि राउत, सुधाकर कुळमेथे,सीताराम आलाम, गोविंदा आलाम,चंदू कोडापे, राकेश सडमेकसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज