Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*उद्या अहेरी येथे काँग्रेसच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन*

*उद्या अहेरी येथे काँग्रेसच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन*

अहेरी : येथे उद्या २२ जून रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल आहे.या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते सत्कारमूर्ती ना.विजय वड्डेटीवार व गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवडे व आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार,प्रमुख पाहुणे महीला जिल्हा अध्यक्ष गडचिरोली ऍड.कविता माहोरकर, सेवानिवृती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी उपस्थित राहणार आहेत.

सदर भव्य नागरी सत्कार सोहळ्याकरिता उद्या २२ जून रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय समोरून भव्य ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तथा आदिवासी विद्यार्थी संघटना व ग्रामसभाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज