Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*ओडीगुडम बोनालु पुजा कार्यक्रमाला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांची उपस्थिती*

*ओडीगुडम बोनालु पुजा कार्यक्रमाला काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांची उपस्थिती*

अहेरी : तालुक्यातील ओडीगुडम येथील प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या महीलम्मा देवी मंदिर परिसरात दरवर्षी बोनालु पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले जाते.यावर्षी सुद्धा २८ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२८ एप्रिल रोजी शाही गंगास्नान,२९ एप्रिल रोजी बोनालु उत्सव आणि ३० एप्रिल रोजी महाप्रसाद वितरण केले जाणार असल्याने या ठिकाणी परिसरातीलच नव्हेतर तेलंगाना राज्यातील भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

काल आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस नेते डॉ.नामदेवराव किरसान साहेबांनी उपस्थित राहून महिलाम्मा देवी मंदिरात पूजाअर्चा करत बोनालु उत्सवात सहभागी झाले.याठिकाणी असलेल्या महीलम्मा मंदिरात आयोजित कार्यक्रमात दरवर्षीच भाविकांची मोठी गर्दी होते.दूरवरून आलेले भाविक तीन ते चार दिवस मुक्कामाने राहतात.त्यामुळे माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी भविकांशी आस्थेने संवाद साधत व्यवस्थेची पाहणी देखील केले.

त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयसाठी महीलम्मा देवी कडे प्रार्थना केली.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,अहेरी काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम,लक्ष्मीकांत भोगांमी काँग्रेस अध्यक्ष भामरागड,रजनीकांत मोटगरे.अनु जाती सेलचे जिल्हाध्यक्ष,रुपेश टिकले परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष ,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगूर,अज्जू पठाण,चंद्रकांत बेजलवार,दिनेश मडावी,सतीश मडावी,सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कमिटीचे सदस्य – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज