महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रच सर्वपक्षीय पदाधिकारी प्रचारात गुंग

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

*काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचेकडून त्या वृत्ताचे खंडन..!*

गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारसभेपासून शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी लांब असून आघाडीत बिघाडी झाल्याचे वृत्त एका पोर्टलने प्रकाशित केले.या वृत्ताचे कॉंग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांनी खंडण केले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते,पदाधिकारी एकसंघ असून इंडिया महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रितपणे प्रचारात दंग असल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष प्रचाराला लागले आहेत.लोकसभा मतदार संघासह अहेरी विधानसभा क्षेत्रातही घटक पक्षाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचार कामाला लागले आहेत.अशात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा प्रमुख तसेच इतर पदाधिका-यांनी निवडणूकीच्या वेळी प्रचाराला दांडी मारल्याचे वृत्त एका पोर्टलने प्रकाशित केले.

सदर वृत्त सपशेल चुकीचे असून शिवसेना पदाधिका-यांसह कार्यकर्ते एकदिलाने उमेदवारांच्या प्रचारार्थ लागले आहे. या वृत्ताच्या माध्यमातून विरोधकांद्वारे महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा डाव खेळल्या जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे अजय कंकडालवार यांनी केला आहे.

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा धर्म पाळत असून वरिष्ठांच्या आदेशानुसार आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अशा अपप्रचाराला बळी न पडता महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने प्रचार करुन उमेदवाराला जिंकून आणावे,असे आवाहनही विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा निरीक्षक अजयभाऊ,महाविकास आघाडीचे नामदेव किरसाण, कंकडालवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here