*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले कोंदावाही येथील नागरिकांची समस्या..!*

एटापल्ली : तालुक्यातील कोंदावाही येथील आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंदावाही येथील दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली,लाईन इलेक्ट्रिक,वण जमीनपट्टेसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले.असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.तसेच त्यावेळी येणाऱ्या आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीबाबत पण चर्चा करण्यात आली आहे.

या चर्चा दरम्यान कोंदावाही येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद पडली आहे.सदर
विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे कोंदावाही गावातील ग्रामस्थांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.गावात विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील पिण्याची पाण्याची समस्या,वृद्ध आणि लहान मुला-मुलींना नानाविध त्रास सहन करावा लागत आहे म्हणून अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.तात्काळ अजयभाऊंनी समंधित अधिकाऱ्यांनी दूरद्वानी द्वारे येथील समस्या सांगून लवकर लवकर कोंदावाही येते नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावी म्हणून सांगितले आहे.त्यावेळी अजयभाऊंची समस्त नागरिक आभार मानले.

यावेळी चर्चा दरम्यान महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वल नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर आत्राम,चींना आत्राम,मारू तलांदे,साईनु सिडाम,रामजी पुंगाती,रामजी कुड्येती,रुपेश मडावी,मधुकर तलंदी,राजू उसेंडी,संजय आत्राम,बाजू तलंडी,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह स्थानिक आविसं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here