Saturday, February 15, 2025
HomeUncategorized*काटेपली येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन*

*काटेपली येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन*

अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या काटेपली येथील जय परसापेन क्लब कडून व्हाॅलीबाॅल सामने आयोजीत करण्यात आले.सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आहे.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक पेसा समिती कडून तर तृतीय पारितोषीक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या कडून देण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.

यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, देवलमरीचे ग्राम पंचायत सदस्य महेश लेकूर, माजी सरपंच इस्पत गावडे,माजी ग्राप.सदस्य संजय गोंडे, इंदारामचे ग्राम पंचायत सदस्य गुलाबरावं सोयांम, किष्टापुर ग्राप माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले, सदाशिव बामनकर, देवलमरी पेसा अध्यक्ष शंकर आत्राम, ग्रा.प. सदस्य विद्या राऊत,ग्राप सदस्य संजुबाई,ग्राप सदस्य विमलताई कूर्री, माजी उपसरपंच जगणाथ मडावी,नागेश राऊत, मरपली ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगांम, सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गर्गम,संतोषभाऊ परसा,लक्ष्मण सडमेक, दिलीप कोडापे, काटेपल्ली पेसा अध्यक्ष लालशाई आत्राम, शंकर बोरकुट, चालुरकर काका, सत्यम तलांडे, विलास आत्राम, बंडू तलांडे, विशाल आत्राम, गणेश मडावी, मुन्ना झाडे, विलास आत्राम, व आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य आदीनी सहकार्य केले संचालन व आभार श्री. श्रीनिवास राऊत यांनी केली.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज