माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी महाशिवरात्री यात्रा निमित्ताने भाव भक्तीने वांगेपली घाटावरील मंदिरात महादेवची पुजन – महाप्रसाद वितरण*

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथील महाशिवरात्री यात्रा निमित्ताने आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते सपत्नीकसह मंदिराच्या गाभाऱ्यातील बारा ज्योति्लिंगांच्या पुजाअर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र व तेलंगाना सिमेवरील प्राणहिता नदी काठावरील वांगेपली घाट समजल्या जाणारे आपल्या परिसरातील एकमेव महादेव मंदिर आहे.महादेवावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये श्रद्धा स्थान म्हणून ओळखले जाते.महाशिवरात्री यात्रा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मोठे प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

यावेळी माजी जि.प.अध्यक्षयांनी समस्त जनतेला भाविक भक्तांना महाशिवरात्री यात्रा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.व भारतीय काँग्रेस पक्ष कडून महाप्रसाद च्या आयोजन करण्यात आली होती.ते भाविकांना वितरण करण्यात आले.

सोबत महाशिवरात्री पुजना यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार पं.स माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार,सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी,वांगेपलीचे सरपंच दिलीप मडावी.माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती उपसभापती गिताताई चालुरकर,माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मेडपली सरपंच निलेश वेलादी,माजी सरपंच गुलाब सोयाम,रज्जाकभाई पठाण,अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.निसार हकीम,बबलूजी सडमेक,गणेश उपलापवार, राघवभाऊ गौरकर,नामदेव आत्राम,ग्रामपंचायत सदस्य संजय आत्राम,स्वपनील मडावी,प्रमोद गोडशेलवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार सचिन पांचर्या,चिंटू पेंदामसह,क्षेत्रातील नागरीक व आविसं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच मोठ्या संख्येने मंदिरातील महादेवाचे भाविक भक्त बंधू भगिनीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here