सिरोंचा तालुका येथे आगामी लोकसभा निवडणुकी बद्दल युवा नेते काँग्रेस अहेरी विधानसभा प्रभारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सिरोंचा तालुक्यातील आविस काँग्रेस कार्यकर्त्यासोबत चर्चा करून आगामी लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा केली. व अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी पदी निवड झाल्या बद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी यांची गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सेलच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे पण शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार पेंटाजी तलांडे,सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जिल्हा परिषद सदस्य सगुनाताई तलांडे, सिरोंचा नगर पंचायतचे नगर उपाध्यक्ष बबलूभय्या पाशा,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, काँग्रेस अनुजाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सिरोचा काँग्रेस नेते आविस तालुका अध्यक्ष बानाय्या जंनगम, काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, महीला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निताताई तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, आविस काँग्रेस ज्येष्ठ नेते मंदा शंकर काका, आविस काँग्रेस नेते मलिकाअर्जुन काका, व्येंकटपुर बामणी सरपंच तथा सीरोंचा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजय आत्राम अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्षा डॉ निसार हकीम, सा. का.ॲड.हनमंतू अकदर, देवलमरी ग्राम पंचायत उपसरपंच हरीश गावडे, इंदाराम ग्राम पंचायत सदस्य गुलाब सोयांम, राजाराम ग्राम पंचायत सदस्य पोरतेट दादा, सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गर्गम, सा.का. नामदेव पेंदाम, सचिन पांचर्या प्रमोद गोडशेलवारसह समस्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.