Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*सिंगणबोयना परिवाराला औषध उपचारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत..!*

*सिंगणबोयना परिवाराला औषध उपचारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत..!*

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मरपल्ली अंतर्गत येत असलेल्या भस्वापूर येथील जेष्ठ नागरिक व्यंकटी मोंडी सिंगणबोयना यांच्या मुलाचे काही दिवसापूर्वी दुचाकीने अपघात झाले होते.या अपघातात सिंगणबोयना यांच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्यांना उपचाराकरीता त्या परिवाराकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदत अंत्यत आवश्यक होती.

ही माहिती येते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन दरम्यान येथील स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं काँग्रेस नेते व अहेरी विधानसभा प्रभारी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष – कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच सिंगणबोयना परिवाराला त्या मुलांचा औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली.त्यावेळी सिंगणबोयना कुटुंबातील समस्त सदस्य नातेवाईक अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ निसार हकीम,ऑड.हणमंतू अकुदारी,माजी सरपंच विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,नरेंद्र गर्गम,नामदेव पेंदाम,बापु बेडकी,ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कोंडागुर्ले,ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट,उपसरपंच हरीश गावडे,माजी सरपंच हनमंतू कोरेत,श्रीनिवास मडावी,शंकर सिडाम,किष्टा सोयाम,अशोक सिडाम,विलास आलाम,रवि मडावी,ग्रा.को.स.अ.निलेश कुळमेथे,अमुल नैताम,वसंत इश्टामसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज