Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पठाण कुटुंबियांची...

*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी पठाण कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले*

अहेरी : तालुक्यातील पेरमिली येथील तालुका पत्रकार संघटना अहेरीचे उपाध्यक्ष आशिफ खान यांचे धाकटे बंधू आरिफ खान पठाण यांच्या चार महिन्या पूर्वी बल्लारशाह येथील वनविभागात वनरक्षक म्हणुन नियुक्ती झाली होते.आरिफ यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याची या दुःखद घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी पठाण कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पप्पू हकीम,माजी सरपंच प्रमोद आत्राम,कवीश्वर चंदनखेडे,रघुनाथ आउकार,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह आदी उपस्थित होते

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज