*लकाचेन येथील जय सेवा क्रीडा मंडळ द्वारा आयोजित ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन*
अहेरी : तालुक्यातील लकाचेन येथील जय सेवा क्रीडा मंडळ द्वारा आयोजित ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं काँग्रेसचे नेते व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतूजी मडावी कडून देण्यात येत आहे.तसेच तृतीय पारितोषिक माजी जि.प.सदस्य मा.अजयभाऊ नैताम कंत्राटदार यांच्या कडून देण्यात येत आहे.
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे गावात आगमन होताच येथील नागरिकांन तर्फे स्वागत करण्यात आले.त्यावेळी सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा – डॉ बाबासाहेब आंबेडकर – वीर बबूराव शेडमाके यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केली.तसेच लकाचेंन येथील नागरिकांची समस्या जाणून घेतले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतूजी मडावी होते.
यावेळी उदघाटन प्रसंगी व्येकटापूर ग्रा.प.चे सरपंच मा.अजय पोरतेट ,उपसरपंच मा.चिरंजीव चिलवेलवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रा.प.सदस्य ममिता कोरेत,चदृ कुळमे सदस्य ग्रा.प.सदस्य,तेराजना कुमराम माजी सरपंच,शामराव कुळमेते पोलीस पाटील,संजय पुरतेट माजी उपसरपंच राजाराम,लकमा सडमेक,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,तिरुपती दुर्गे,अंकुलू पानेम, सागर कुळमेते,सतीश पानेम,धनंजय भाऊ,मनोहर पागडे पोलीस पाटील ,सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.