*तलवाडा येथिल जय सेवा क्रिडा मंडळ यांच्या सौजण्याने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..!!*
अहेरी तालुक्यातील मौजा तलवाडा येथे जय सेवा क्रिडा मंडळ यांच्या सौजण्याने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आविस काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतुजी मडावी होते. तर प्रमुख पाहुणे म्हनुन माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम होते.
या व्हॉलीबॉल स्पर्धेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक, सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतुजी मडावी यांच्या कडून द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक निलेश वेलादी सरपंच ग्राम पंचायत मेडपल्ली व मा.श्री.जी डी मडावी सचिव ग्राम पंचायत मेडपल्ली यांच्या कडून देण्यात येत आहे
यावेळी नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, पेरमिलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राप.सदस्य प्रमोद आत्राम, मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी,ग्राप.सदस्य मेडपली कु. निरंजना वेलादी, पेसा अध्यक्ष तलवाडा वासुदेव सिडाम, सामजिक कार्यकर्ते स्वप्निल मडावी, नरेंद्र गर्गम,कृष्णा वेलादी, संतोष आत्राम, मंगुजी पोदाडी, सुमन पोदाडी, टिंकु सल्लम, नितीन वेलदी, सुधाकर पोदाडी, अमित तेलामी, हर्सल आत्राम, सुरज आत्राम, आकाश मडावी, गुणवंत कांबळेसह गावातील नागरिक आवीस काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.