*सर्व ग्रामस्थांनी प्रमुख मागण्या घेवून ग्राम पंचायत समोर ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्या ना झाल्यास ग्राम पंचायतीला कुलुप ठोकणार,आलापल्ली बंद*

0
225

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांनी या आंदोलनात सहभागी*

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील ग्रामस्थांनी आज दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायत समोर ठिय्या आंदोलन व प्रमुख मागण्या ना झाल्यास ग्राम पंचायतीला कुलूप ठोकणार या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार , व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी,सहभागी झाले.

आलापल्ली येथील ग्रामस्थांनीचे प्रमुख मागण्या ग्रामपंचायत अधिनयमाचे भंग करणारे सरपंच,उपसरपंच यांना अधिकार पदावरून काढून टाकावे. मालगुजारी तलावात अवैध बांधकाम करणारे सचिव व सरपंच यांचे विरूद्ध कार्यवाही करण्यात यावे. ग्राम पंचायत आलापल्ली अंतर्गत दिनांक १५/०२/२०२१ पासून विविध योजने अंतर्गत केलेल्या कामाची व साहित्य खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यात यावे. ग्राम पंचायत अंतर्गत असलेले कोंडवाडा जमिनीचे चौकशी करून दोषी सचिव यांचेविरुद्ध कार्यवाही करावी.पोलीस चौकी लगतचे शासकीय जागेचे व इतर शासकीय जागेचे खाजगी लोकांना घरटेक्स पावती देवुन अतिक्रमण करणाऱ्याना सहकार्य करून अधिकाराचा गैरवापर करणारे संपूर्ण ग्रामपंचायात बरखास्त करावी. नागरी पाणी पुरवठा योजनेत कंत्राटदार यांनी काम पूर्ण केल्यानंतर सह महिनेपर्यंत गुणवत्ता व दर्जा न तपासता ग्राम पंचायत गुणवत्ता व दर्जाहिन कामाचे पूर्णत्वाचा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्याची चौकशी करावी. नागरी पाणी पुरवठा योजनेत लाभार्थीकडून नळ जोडणीचे ३० फूट पाईप न देता लाभार्थ्यांची फसवणूक केली व लाभार्थ्यांकडून त्याचे पैसे घेतले त्याची चौकशी करावी. ग्राम कोष रक्कमेचे गैरव्यवहार प्रकरणी जुने गुन्हे दाखल केलेले आहे याची राखोल चौकशी करून गुन्हेगारकडून रक्कम वसूल करावे. स्वच्छ भारत योजने अंतर्गत स्वच्छतागृह बांधकामात ज्यांनी स्वचछतागृह बांधकाम केलेले नाही त्यांना अनुदान वाटप करण्यात आले. ज्यांनी स्वच्छतागृह बांधकाम केले त्यांना परिपूर्ण अनुदान वाटप करण्यात आलेले नाही सदर गैरव्यवहाराची चौकशी करावी.असे अनेक प्रमुख मागण्या घेवून ग्राम पंचायत समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येत आहेत

यावेळी माजी पंचायत समिती सभापती भास्कर भाऊ तलांडे, सामजिक कार्यकर्त्या स्वप्नील भाऊ मडावी, मरपल्ली ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक भाऊ तोगम, प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्य,किशोर सडमेक, दौलत उरेत, यादवशहा आत्राम, प्रकाश कोरेत, अविनाश मेश्राम, दिलिप आत्राम, ईश्वर वेलादी, सूरज मडावी, संजय आत्राम, मदन गावडे, मनोज सडमेक, पत्रू आत्राम, रघुपती सिडाम, देवाजी पोरतेट, श्रीहरी तलांडे, सुधाकर कोरेत, हनुमंत कोरेत, विजय आत्राम, माणिकराव आत्राम, सुरेश आत्राम, दुर्गय्या चिंतावार, हनुमंत कोरेत, कृष्णा आत्राम, दिवाकर मडावी, दासरू मडावी ताराचंद्र गजभिये उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here