*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन..!*

0
42

*देवलमरी येथील न्युस्टार व्हाॅलीबाॅल मंडळ देवलमरी द्वारा भव्य खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन*

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील न्युस्टार व्हाॅलीबाॅल मंडळ देवलमरी द्वारा भव्य खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी आविसं काँग्रेसचे नेते व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक पेसा समिती ग्रामंचायत देवलमरी कडून देण्यात येत आहे.तसेच तृतीय पारितोषिक कंत्राटदार साई बोमावार यांच्या कडून देण्यात येत आहे.

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे गावात आगमन होताच येथील नागरिकांनी विविध नूत्य करत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.त्यावेळी सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा – डॉ बाबासाहेब आंबेडकर – वीर बबूराव शेडमाके यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केली.तसेच देवलमरी येथील नागरिकांची समस्या जाणून घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतूजी मडावी होते.

यावेळी उदघाटन प्रसंगी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी बाजार समिती संचालक येलाय्या तोकला,माजी सरपंच पेंटूबाई पोरतेट,ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,इंदाराम ग्रामपंचायतचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम,वांगेपली ग्रामपंचायत सरपंच दिलीप मडावी,माजी ग्रामपंचायत सदस्य जगणाथ मडावी,ग्रामपंचायत सदस्य महेश लेकुर,ग्रामपंचायत सदस्य विद्याताई राऊत,ग्रामपंचायत सदस्य संजूबाई आत्राम,ग्रामपंचायत सदस्य विमलाताई कुर्री,माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण मज्जरवार,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पठाण,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेक,नरेंद्र गर्गम,श्रीनिवास राऊत,संतोष परसा,महेश लेकुर,शंकर आत्राम,सुधीर बामणकर,सदाशिव बामणकर,नागेश राऊत,संजय गोंडेवार,रमेश मेशिन,प्रमोद आत्राम,व्यंकटेश पानेम,अक्षय सडमेक,सुरज ढगे,सतिश बिछाला,राजू परसावर,सुरज काटेल,संदीप दुर्गे,प्रकाश दुर्गे,प्रवीण अल्लेवार,कार्तिक राऊत सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here