Saturday, February 15, 2025
HomeUncategorizedमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथे कस्तुरबा...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ध्वजारोहण

*अहेरी:* २६ जानेवारी हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा केला जातो.२६ जानेवारी १९९० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक दिन घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७५ व्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

आज या प्रजासत्ताक दिनी निमित्त कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इंदाराम येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.

तालुकास्तरीय बाल क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धा सत्र 2023 चे आयोजन क्रीडा संकुल आलापल्ली येथे करण्यात आले या ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम च्या विद्यार्थिनी कबड्डी, खो खो, हाॅलीबॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, 100 मी.दौड,400मी.दौड,400मि.रिले प्रथम क्रमांक प्राप्त केला.200मी दौड द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच माध्यमिक विभाग चॅम्पियनशिल्ड ही पटकाविले. करिता आज २६ जानेवारी निमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी विजय मिळवलेले विद्यार्थिनींचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी सरपंच वर्षाताई पेंदाम,उपसरपंच वैभव भाऊ कंकडालवार, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, ग्राम पंचायत सदस्य शाकीर शेख,ग्राम पंचायत सदस्य कविता सोयाम, ग्राम पंचायत सदस्य शालानी कांबळे, ग्राम पंचायत सपना कोरेत, माजी सरपंच नामदेव आत्राम,पोलीस पाटील सदशिव दुर्गे, भगवंतराव हायस्कूलचे मुख्याध्यापक ममीडालवार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे मुख्याध्याक पुल्लुरवार सर, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयचे मुख्याध्यापिका ढवस मॅडम,श्रीनिवास कोत्तावडालवार, बलचेंद्रा मेश्राम , मरपल्ली ग्रा.प माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम सह गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज