Saturday, February 15, 2025
HomeUncategorizedप्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्त इंदाराम ग्राम पंचायतचे उपसरपंच वैभव भाऊ कंकडालवार...

प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्त इंदाराम ग्राम पंचायतचे उपसरपंच वैभव भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप

अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे श्री राम जन्मभुमी अयोध्या येथे भव्य नवनिर्माण मंदिरातील प्रभु श्रीरामाचे प्रतिष्ठापना महोत्सव निमित्त इंदाराम हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या श्रीरामाचे प्रतिष्ठापना महोत्सव कार्यक्रमाला इंदाराम ग्राम पंचायतचे उपसरपंच श्री वैभव भाऊ कंकडालवार सह कुंटब उपस्थित राहून प्रभु श्रीरामाचे विविध पुजा अर्चा करून दर्शन घेतले

यावेळी प्रभु श्रीरामाचे प्राण प्रतिष्ठा निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसाद इंदाराम ग्राम पंचायतचे उपसरपंच वैभव भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला गावातील नागरिक व गुरूमाऊली भजन मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज