Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedअष्टमप्रहार महानाम संकीर्तन भागवत प्रवचन कार्यक्रमला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

अष्टमप्रहार महानाम संकीर्तन भागवत प्रवचन कार्यक्रमला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

मूलचेरा : तालुक्यातील भगतनगर येथील सार्वजनिक श्रीश्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला आविसं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.

मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील अनेक गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगतनगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.असता आयोजित कार्यक्रमास माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मंदिरास भेट देऊन विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले.

यावेळी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ शाहा,आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडाव ,श्री श्री राधागोविंद मंदिर कमिटीचे अध्यक्ष मनोमली बिस्वास, संजय बॅनर्जी, पुलोक तालुकदार, प्रकाश मंडल, सुनील मंडल, रामपद मिस्त्री,पुलू बेपारी,संतोष बेपारि,रंजन सरकार,प्रंतोश तालुकदार,सुखीचंद दास,अमोल तालुकदार,अमर मंडळ,सपण देवणाथ,मनिंद्र राय,श्रीकृष्ण मंडल, संजय बॅनर्जी,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,गोमनीचे ग्राम पंचायत सदस्य शुभम शेंडे,माजी उपसरपंच कार्तिक तोगाम,सामजिक कार्यकर्ते स्वप्नील मडावी,नरेंद्र गर्गम,निलेश ओलालवार,विवेक कोळकांटिवार,अनिल डूब्बुलवार,प्रमोद गोडशेलवारसह आविस काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज