Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून डोळ्याच्या...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या कडून डोळ्याच्या ऑपरेशन साठी आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत किस्टापुर ( दो )अंतर्गत येत असलेल्या दोडगिर येथील रहिवासी संतोष सम्मा वेलादी यांना डोळ्याच त्रास असल्यामुळे यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी जाण्याकरीता व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी उपचाराकरिता त्यांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना डोळ्याच्या ऑपरेशन साठी अडचण भासत होती.

ही अडचण आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देचलीपेठा दोऱ्यावर असताना त्यांचे नातेवाईक व स्वता आजारी असलेले संतोष वेलादि यांनी आपली समस्या सांगताच अजयभाऊ यांनी रुग्णांस अहेरी जनसंपर्क कार्यालय येते बोलवून संपुर्ण उपचारकरिता आर्थिक मदत केली.त्यावेळी अजयभाऊ त्या नातेवाईकांना सांगितले की पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी म्हणून सांगितले . वेलादी परिवारातील सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी उपस्थित प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,नरेश गर्गम,सन्नी वेलादि,संमा वेलादी,प्रकाश दुर्गे कुमार गुरनुलेसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज