Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत पेरमिली येथील रंजु रामू मडावी वय 35 वर्षे यांची आकस्मित मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह पेरमिली वरून उपजिल्हा रुग्णालय अहेरी पोस्टमोडम करण्यासाठी घरच्या कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.सदर माहिती आविसंचे माजी सरपंच प्रमोद आत्राम यांनी दूरध्वनी द्वारे त्यांचेपरिस्थिती आविसं – राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना कळवताच त्यांनी एका क्षनांचा सुद्धा विलंब न करता मृतकांचे मृतदेह हे पेरमिली ला नेण्यासाठी अहेरी येथील शववाईका बोलेरो वाहन उपलब्ध करून देत आर्थिक मदत केली आहे.

यावेळी अहेरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गेसह आविसं राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज