Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedअय्यापा स्वामी कमिटीचे पदाधिकारी - सदस्यांनी घेतली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची...

अय्यापा स्वामी कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी घेतली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील अय्यापा स्वामी कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी आज आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेतले.

या भेटीदरम्यान अय्यपा स्वामी कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी आपल्या अडचणी अवगत करून दिल्या.लगेचच माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.व त्यांना आश्वासन दिले की मंदिरात पुढील होणाऱ्या कार्यक्रमा करिता.अडचण पडल्यास मी सदैव मदत करीन.यावेळेस मंदिर कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मंदिरात दर्शनासाठी विनंती केली

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेकसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंदिर कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज