Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन

चामोर्शी : तालुक्यातील येडानूर येथील नवयुवक क्रीडा मंडळ येडानूर यांच्या सौजन्याने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चषक 2023 कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केली आहे.सदर या स्पर्धेचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघा काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी होते.

हा स्पर्धेसाठी काँग्रेसचे नेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 30,001/- देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक 22,001/- तर तृतीय पारितोषिक दिलीप उडम आणि रुपेश लेनगुरे यांच्या कडून 15,001/- देण्यात येत आहे.

यावेळी रजनीलई उसेंडी सरपंच,संतोष पदा,जिवन पोटावी,रवि कुळमेथ,बालाजी पोटावी,पांडुरंग उसेंडी,मुरलीधर कुभ्भावार,पत्रू पोटावी,विनोद संतोषवार,टि.डी हरडे ग्रामसेवक,पवन पवार,कोमलताई पोटावी,रामसिंग राठोड,शुभम जाधव ग्रा.स,उमेश पोटावी,बंडू कुंभ्भावार,आकाक्षाताई पोटावी,उमाताई पोटावी,राजेश दुर्गे ग्रं.स,प्रमोद गोडसेलवारसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज