*अहेरी बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामनेचे उदघाटन!!*
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील प्राणहिता क्रिकेट क्लब इंदाराम द्वारा आयोजित भव्य टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन श्री रामजी कोरत यांच्या भव्य पटांगणावार सार्व तालव इंदाराम येथे आयोजित करण्यात आले होते.आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काडून जंगी स्वागत केले.तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.
या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 50,001/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक गांडली समाज मंदिर अहेरी तर्फे 30,001/- तृतीय पारितोषिक बिट इंदाराम वनपरिक्षेत्र आलापल्ली अहेरी विभाग कडून 20,001/-असे या स्पर्धेसाठी तीन पारितोषिक देण्यात येत आहे.
उदघाटन यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आदर्श शिक्षक पुलूरवार सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदाराम येथे कार्यरत आहेत आपल्या गावातील शिक्षकास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे आनंद व्यक्त करत गावकऱ्यांनी व अजय भाऊ कंकडालवार कडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. वर्षाताई पेंदाम सरपंच ग्राम पंचायत इंदाराम,वैभव कंकडालवार ग्रामपंचायत उपसरपंच इंदाराम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य इंदाराम,सपना कोरत ग्रामपंचायत सदस्य इंदाराम,अशोक येलमुले माजी उपसरपंच,दिलीप मडावी सरपंच ग्राम पंचायत वांगेपल्ल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक श्री पुलुरवार सर, सुधाकर तिम्मा,श्रीनिवास आलम,गणेश चौधरी,रमेश आत्राम,बबिता आत्राम,लालू दुर्गे शंकर गोमासे लालू आलाम नरेश गर्गाम राकेश सडमेक,लक्ष्मण आत्रामसह मंडळाचे अध्यक्षउमेश कोरेत,उपाध्यक्ष प्रकाश सोयाम,सचिव निखिलेश तलांडे,कोषध्यक्षा अतुल नैताम, सहसचिव नागार्जुन कोरेतसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.