*सिरोंचा येथील आविसं कार्यकर्त्यांच्या बैठकीत कंकडालवार यांनी जाहीर केले काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निर्णय*
सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवाराचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या उज्वल भविष्यासाठीच आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असून माझा या निर्णयाला आपण सगळ्यांनी एकमताने सहमती दर्शवतील व आपण सर्वांनी माझे सोबत पक्ष प्रवेश करतील या दृढविश्वासाने मी आज आपल्यापर्यंत आल्याचे आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.
सिरोंचा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आयोजित आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजयभाऊ कंकडालवार यांनी वरील निर्णय जाहीर केले.
सिरोंचा येथे आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मांडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रवेशाचे निर्णयाला उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने सहमती दर्शवित या निर्णयाला दुजोरा दिले.
“या”बैठकीत अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढे बोलतांना म्हणाले कि,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हायकमांड कडून आपल्याला व आपल्या सर्वांना त्यांच्या पक्षात प्रवेश देण्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण मिळाले असून येत्या 24 डिसेंबर रविवारला आल्लापल्ली येथे पक्षप्रवेश कार्यक्रम होणार असल्याने या पक्षप्रवेश कार्यक्रमात माझेसोबत आपण सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे विनंती केले.
सिरोंचा येथे आयोजित बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर,बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,माजी सरपंच ताल्ला वेंकण्णा,असरअल्ली ग्रा.पं.चे सरपंच रमेश मेकला,सिरोंचा नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा, बाजार समितीचे संचालक नागराज इंगीली,उपसरपंच अशोक हरी,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,संतोष पडाला,नगरपंचायत सभापती भवानी गणपुरपू,बामणीचे सरपंच अजय आत्राम,गर्कपेठा सरपंच सुरज गावडे,किरणकुमार वेमुला,रामचंद्रम गोगुला,गादे सोमय्या,जोडे तिरुपती आदी उपस्थित होते.
तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीला नगरसेवक नरेश अलोने,इम्तियाज खान ,राजेश बंदेला, नागेश दुग्याला,सतीश भंडारी,लक्ष्मण येलेला,प्रशांत गोडशेलवार,नारायण मुडमडगेला,माजी उपसरपंच दुर्गम तिरुपती,महेंद्र दुर्गम,अशोक इंगीली,उपसरपंच दासरी व्येंकटी,महेश तलांडी,संपत हरी,वासू सपाट,श्रीनिवास दुर्गम,आनंद आशा,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,रवी बरसगांडी,सागर कोठारी,राजू पडाला,गणेश रच्चावार,लवण पागे,लक्ष्मण बोल्ले,महेश तलांडे,सुरेश पेगडपल्ली,सडवली सेग्गम,राकेश सडमेक,सागर कोटारी,श्रीकांत अंतर्गमसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.