Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedग्रामीण भागातील खेळाडूंना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल किट दिली भेट

ग्रामीण भागातील खेळाडूंना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्हाॅलीबाॅल किट दिली भेट

एटापल्ली : तालुक्यातील मैजा येथील युवकांना क्रिकेट, बॅडमिंटन,फुटबॉल,टेनिससह आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत.त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना
क्रिकेट,बॅडमिंटन,फुटबॉल,टेनिस सह आदी खेळ सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाहीत.त्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना नाहीच नाही.त्यामुळेच गुणवत्ता असूनही केवळ पैसा नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू मागे राहतात.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना परवडेल असा खेळ खेळण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.

अशा”या”खेळाडूंना परवडणारा व्हॉलीबॉल हा खेळ आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.मुंबईत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी करंडक व्हॉलीबॉल स्पध्रेत हीच मुले-मुली आपले कौशल्य दाखवत आहेत.या”निमित्ताने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी व्हॉलीबॉल किट भेट देण्यात आली.

जिल्ह्यातील खेळाडू खेळामध्ये मागे नाहीत मात्र खेळ शिकण्यासाठी खेळाचे साहित्य आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे साहित्य नसल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग खेळामध्ये मागे आहेत.प्रत्येक युवकांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे.याहेतूने व्हाॅलीबाॅल किट भेट देण्यात आल्याचे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज