माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना संस्थेचे संचालक मंडळ नी निवेदन देऊन मागणी केली..
मुलचेरा : तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी संस्था लगाम येते धान खरेदी केंद्र असून 2023-24 या सत्रात सस्थेची पंचवार्षिक कमिटी नव्याने निवडून आलेली असून या सत्रात धान खरेदी करण्यास इच्छुक आहे परंतु मा.उपप्रादेशिक व्यवस्थापक अहेरी यांना निवेदन देऊन सुद्धा लगाम संस्थेला खरेदी केंद्र मंजूर केलेली नाही
तरी जुन्या व्यवस्थापक कमिटीने जे काही अपरातपर केलेली आहे ते नवीन कमेटीला मान्य नसून आणि नव्याने निवडून आलेली कमेटी धान खरेदी करण्यास व संस्था चालवण्यास इच्छुक आहे तरी हंगाम 2023-2024 या सत्रात धान खरेदी केंद्र मंजूर करावी अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष व कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केले
यावेळी श्री.मोतीराम मडावी सभापती,बालाजी गंगा सिडाम उपसभापती,मल्ला बुरी पानेमवार संचालक,किर्तीमंतराव संचालक,नानाजी विस्तारी बुरमवार संचालक,संतोष पोचु उरेते संचालक,वासुदेव हनमांतू मडावी संचालक,चिंना पेंटा नैताम संचालक,नानाजी रगु शेडमाके संचालक तसेच आ.वि.स. व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.