“ग्रामसभा घोटपाडी तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!!*

0
57

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे शुभहस्ते उदघाटन संपन्न!!*

भामरागड : तालुक्यातील घोटपाडी येथे ग्रामसभा घोटपाडी तर्फे भव्य आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधू पुंगाटी प्रतिष्ठित नागरीक, घोटपाडी,लक्ष्मीकांत बोगामी होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विजय ओक्सा लाहेरी,लालसू आत्राम,सुधाकर तिम्मा आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे भामरागड तालुकाध्यक्ष,शामराव येरकलवार,सुखराम मडावी माजी प.स.सभापती भामरागड,प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमिली,सुरेश सिडाम माजी सरपंच लाहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अध्यक्ष:सुरेश पुंगाटी,उपाध्यक्ष:कोमटी पुंगाटी,सचिव:नादेश्वर पुंगाटी, सहसचिव : राजू पुंगाटी,कोशाध्यक्ष : प्रकाश वड्डे काम केले.सल्लागार समिती – सदस्य-मालू पुंगाटी,राजेश पुंगाटी,संन्याशी पुंगाटी,मनोज वड्डे,मंगरू मिचा,राजू वड्डे,सरजू वड्डे,सुरज वड्डे,प्रकाश वड्डे,प्रकाश वड्डे,सोमजी मज्जी,अनिकेत पुंगाटी,विनोद पुंगाटी,अशोक पुंगाटी,आशुतोष पुंगाटी,किशोर पुंगाटी,सुरेश पुंगाटीसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here