*विदर्भतील विविध विषयांवर चर्चा करून विदर्भाचा ७/१२ पुस्तक दिले भेट!!*
अहेरी : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या आज अहेरी निवास्थांनी येथील विदर्भ आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन.विदर्भ आंदोलना विषयीबाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून.विदर्भ राज्य आंदोलना बाबतीत माहिती देऊन.विदर्भाचा ७/१२ पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप,मुकेश मासूरकर,युवा आघाडी अध्यक्ष तात्यासाहेब,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.