अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत देवालमरी येथील शेतकरी – रमेश पोशालू मारीन वय 45 वर्षे यांनी स्वतःच्या शेतात पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा स्वाशाच्या माध्यमाने औषधी गेल्याने ते आपल्या शेतातुन घाबरलेल्या अवस्थेत घरी आले होते.रमेश मारीन यांना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.परंतु उपचार सुरू असताना त्यांना आपला प्राण गमवावा लागला.रमेश मारीन यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शवविच्छेदन व शव घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांना अडचण भासत होती.त्यांना मदतीची अत्यंत गरज होती.
देवलमारी येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते व अजयभाऊ कंकडालवार यांच्या कट्टर समर्थक – महेश लेकूर व कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन.मृतांच्या नातेवाईकांची आस्तेने विचारपूस करून झालेल्या घटनेचे परिपूर्ण माहिती घेऊन.शासनाकडून मिळणाऱ्या योजनेमधून काही मदत मृतांच्या वारसांना मिळवून देण्यास प्रयत्न करणार म्हणून नातेवाईकांना सांगितले मृतांच्या नातेवाईकांची अवस्था पाहून स्वतः शवविच्छेदनास व शव स्वगावी नेण्यासाठी अहेरी नगरपंचायत येथील स्वर्गरथ वाहन उपलब्ध करून दिली.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी मारीन कुटुंबियांना आर्थिक मदत केली.अजयभाऊंनी नातेवाईकांना सोबत म्हंटले”की”पुढील होणाऱ्या कार्यक्रमाला अडचण लागले तर संपर्क करा मी मदत करण्यासाठी तयार अहो असे नातेवाईकांना सांगितले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गलबले,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,श्याम ओंडरे,कुमार गुरनुले,महेश गेडाम,प्रकाश दुर्गे,श्रीनिवास राऊत,मृतकांची सहकुटुंबा नातेवाईक तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.