माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह परिवार दिली जय श्री राम गणेश मंडपाला भेट व महाप्रसाद वाटप

0
72

अहेरी :तालुक्यातील आल्लापली येथील न्यू फॉरेस्ट कॉलनी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मंडळानी श्रीगणेशाची भव्य मूर्तीची स्थापना केली.दरवर्षप्रमाणे यावर्षी सुद्धा जय श्री राम गणेश मंडळ तर्फे नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी जय श्री राम गणेश मंडपाला सदिच्छा भेट देऊन.श्रीगणेशाची विधिवत पूजा करून – दर्शन घेतले तसेच भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित युवराज अजय कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज वैभव कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार नरेश गर्गम,राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here