अहेरी / इंदाराम : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा इंदारम येथे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त श्रीगणरायाची विधिवत पूजा व अर्चना करून भक्तिमय वातावरणात श्रीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.श्रीगणेश चतुर्थी निमित्त कंकडालवार यांनी समस्त जनतेला शुभेच्छा दिले. समस्त जनता नेहमी आनंदी,निरोगी सुखीजीवन लाभावे म्हणून त्यांनी श्री गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केले.
इंदाराम येथील श्रीची प्रतिष्ठापना तसेच पूजा व अर्चना वेळी त्यांचे मातोश्री मंदाबाई कंकडालवार,पत्नी सोनालीताई कंकडालवार,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,स्मिता वैभव कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,रिध्वी कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम,आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.