*आल्लापल्ली येथील  बसस्थानकाची बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या..!*

0
69

*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी*

अहेरी : तालुक्यातील आल्लापल्ली येथील नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण झालेले नाही.बांधकाम अपूर्ण असताना बसस्थानाकाची लोकार्पण केले आहे.परिणामी प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. बसस्थानकाची बांधकाम काम अपूर्ण असतांना स्थानिक मंत्रीमहोदय आणि माजी पालकमंत्री यांनी फक्त श्रेय लाटण्यासाठीच घाईगडबडीत लोकार्पण केल्याचे आरोप आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

अहेरी येथील मंत्र्यांनी आल्लापल्ली येथील नवीन बसस्थानकाची श्रेय घेण्यात व्यस्त असले तरी त्या ठिकाणी प्रवाश्यांसाठी योग्य सोइसुविधा केले किंवा नाही याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते.मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

आल्लापल्ली येथील नवीन बसस्थानक परिसरात व सभोवताल खडीकरणाचे तसेच उर्वरित बांधकामासाठी संबंधित विभागाने तात्काळ निधीची तरतूद करून बसस्थानक परिसरात आवश्यक काम करून प्रवाश्यांची गैरसोय थांबविण्याची मागणी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.https://youtu.be/tAeEa1Fypbo?feature=shared

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here