माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी धावून आले अपघातातील जखमींच्या मदतीला

0
99

अहेरी : दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार धाऊन गेले.उपचारानंतर त्यांनी आपल्या वाहनातून जखमींना घरी पोहोचवून दिले.तसेच गंभीर जखमीला जिल्हा रुग्णालयात पाठविले.या अपघातात दोघांना किरकोळ मार लागला असला तरी एका मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला.नागुला नानया येलूर,पदमा गणपती राऊत आणि श्रेया गणपती राऊत अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण पुसुकपल्ली येथील रहिवासी आहेत.प्रकृती ठिक नसल्यामुळे ते आलापल्ली येथील खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आले होते.तेथून परत दुचाकी वाहनाने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनासोबत त्यांच्या वाहनाची जोरदार टक्कर झाली.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी तिकडे धाव घेतली.पण तोपर्यंत त्यांना सरकारी वाहनाने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.डॉक्टरांनी एक्स-रे काढून पाहिल्यानंतर नागुला आणि पदमा यांना किरकोळ मार लागला होता. पण श्रेया गणपती राऊत या मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला होता.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन रुग्ण व डॅाक्टरांची भेट घेतली.किरकोळ जखमी झालेल्या दोघांना त्यांनी स्वतःच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या गावी पाठवून दिले. तसेच श्रेया राऊत हिला पुढील उपचारासाठी गडचिरोलीत जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती साचालक राकेश कुळमेथे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,पेसा अध्यक्ष रमेश भोयर,समाजसेवक विलास धदरे,रमेश डोके,सुधाकर जनका पूरे,बाबुराव चौधरी,मलेश चौधरी,संतोष केरकर,संतोष येलूर,व्हेकटेश येलुर,नागेश येलुर विनायक दधद्रे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here