*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी येत्या 7 दिवसात कामे सुरू न झाल्यास आंदोलनांचा इशारा !!*
अहेरी : तालुक्यातील महागांव शुभषानगर या रस्ताची काही महिन्यांपूर्वी पासून रस्त्यावरील मोठ – मोठे खडे पडून आहे.येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना व प्रवासांना त्या खड्डेमूळे त्रास सहन करावे लागत आहे.अहेरी – महागांव – सुभाषनगर या मुख्य मार्गावर रुग्णालय आणि शालेय विध्यार्थ्यांना,गर्भावती महिलांना या रस्त्याचा वापर करत असल्यामुळे त्यांचे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.त्याकरिता सदर रस्त्यावर समस्येवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता लक्ष ध्यवी म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रमणध्वनीवरून या पुढील 7 दिवसात डांबिकारनाचे कामे चालू करून खड्डे बुजवावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भ्रमणध्वनीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता याना सांगण्यात आले.