गोलाकर्जी येते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न
▪️माजी पं.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रमुख उपस्थिती ▪️

अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय खाँदला अंतर्गत येत असलेल्या गोलाकर्जी येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते व आज सदर अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास झाल्यामुळे अंगणवाडी बालकांना बसण्यासाठी म्हणून सदर अंगणवाडीची उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,खाँदलाचे उपसरपंच श्री.राकेश सिडाम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्राम पंचायत सदस्या सौ.अरुणा सड़मेक,खाँदलाचे माजी सरपंचा सौ.लक्ष्मी श्रीरामवार,राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,माजी ग्राम पंचायत सदस्य श्री.सुधाकर आत्राम,पाटील बिचू मडावी,पाटील श्री.मूत्ता पोरतेट,अँड.एच.के.आकदर,
श्रीनिवास राऊत,वसंत सड़मेक,दिपक अर्का,सुरेश सोयाम,नारायण चालुरकर,नामदेव पेंदाम,संतोष श्रीरामवार,चंद्र आत्राम,सचिव कु.एस.सड़मेक,अंगणवाडी सेविका सौ.संगीता आत्राम,कर्मचारी येंकटेश अलोने,नरेंद्र गरगम,व गावातील पुरुष-महिला व बालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here