Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार*

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार*

गडचिरोली : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी देसाईगंज – वडसा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना देसाईगंज – वडसा येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते व फॅशन मालचे मालक जेसाभाऊ मोटवानी आणि नगरपंचायतचे नगरसेवक हरीशभाऊ मोटवानी यांच्या भेट घेतली.भेटी दरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील तिनीही आजी – माजी आमदारांच्या विरोधात जाऊन अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत एक हाती सत्ता प्राप्त करून सभापतीपदी विराजमान झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार करण्यात आली.तसेच विविध विषयांवार चर्चा करण्यात आले.

यावेळी नरेश गर्गम,शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगडे प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज