Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*कृषि महाविद्यालय खंडाळ येथील विध्यार्थ्यांनी राबवले वृक्षारोपण उपक्रम!!*

*कृषि महाविद्यालय खंडाळ येथील विध्यार्थ्यांनी राबवले वृक्षारोपण उपक्रम!!*

औरंगाबाद : खंडाळ येथे कृषि महाविद्यालय येथील कृषि दूत ग्रामीण जागरुकता व कार्यानुभव कार्यक्रमां अंतर्गत बेलगाव गावात स्वातंत्र्य दिन निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आली.बालेगाव शाळेतील विध्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय समोर ध्वजारोहण झाले.आणि नंतर शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमचे शेवटी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच त्यांना खाऊ देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेलगाव येथील सरपंच( कल्पना ताई संजय गडाख ), शाळेचे प्राचार्य (राऊत सर ),उपसरपंच आणि ग्रामपंचायत इतर सदस्य व कृषि विद्यालय खंडाळाचे प्राध्यापक भुसणार एल.डी. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषि विद्यालयतील कृषिधूत राधा ब भंडारी, दिव्यांनी दुर्गे, वेदांती हुसुकले, कोमल नलावडे, पूनम श्रीनामे, समीक्षा मसराम,गीतिका, शांतीप्रिया,ज्योत्सना यांनी केली.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज