गडचिरोली : आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल गडचिरोली – वडसा देसाईगंज तालुक्यातील दौऱ्यावर जात होते.दौऱ्यात असतांना आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते संजू सिडाम यांचे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात आजाराने मूत्यू झाल्याची बाब कार्यकर्त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना माहिती दिल्याने लगेच अजयभाऊ कंकडालवार यांनी कार्यक्रम बाजूला ठेवून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली व कंकडालवार यांनी रुग्णालयातील सिडाम कुटुंब सदस्यांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले.त्यावेळी सिडाम कुटुंबियांना रुग्णवाहिका उपलब्ध नसून शव घरी पोहचण्यासाठी अडचण भासत होती.सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी शव घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन पुढील अंत्यविधी साठी आर्थिक मदत केले.आज माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गुड्डीगुडम येथील होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमाला उपस्थिती राहून सिडाम परिवारातील सदस्यांना मोठ्या आस्तेने विचारपूस करून कार्यक्रमाला आर्थिक मदत केले.
यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,शिवराम पुल्लूरी,मिथुन देवगडे,राकेश सडमेक,विनोद रामटेके,रवी भोयर,प्रकाश दुर्गेसह आदि उपस्थिती होते.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सिडाम परिवारातील दुःखत सहभागी झाले.