Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedबुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत!!*

बुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत!!*

अहेरी : नगरपंचायत क्षेत्रातील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.अहेरी नगरपंचायत परिक्षेत्रात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप जास्त असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.या बांधकामाचा नियोजन मोठा असल्याने मंडळाचे सदस्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परीवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाज मंदिरासाठी यापूडे ही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,परशुराम दाहागावकर,शामभाऊ ओंडरे,मिलिंद अलोने,रोहित ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,दिलीप मडावी सरपंच,राजेश पोरेड्डीवार,नितीन पुल्लूरवार वांगेपल्ली उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज