*राजाराम येथे जागतीक आदिवासी दिन साजरा*      

0
164

*माजी सभापती श्री.भास्कर भाऊ तलांडे यांची प्रमुख उपस्थिती*

अहेरी:-दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजी वीर बाबूराव शेडमाके चौक,व संग्रामशाह मडावी चौक येथे जागतीक आदिवासी दिन गावातील शेकडो आदिवासी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम माता मंदिर येते दर्शन घेवून वीर बाबूराव शेडमाके चौकात गोटुल समितीचे उपाध्यक्ष श्री.तिरुपती कुडमेथे यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले असून त्यानंतर भव्य दिव्य रैली काढून संग्रामशाह मडावी चौकात सर्व समाज बांधव एकत्र येवून चंद्रुशाही आलाम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहन करण्यात आली असून अहेरी पंचायत समितिचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी समाज बांधव माजी सरपंच श्री.नागेश कन्नाके,माजी सरपंच श्री.विनायक आलाम,माजी सरपंच श्री.व्येंकटेश मडावी,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,माजी ग्राम पंचायत सदस्य श्री.सतीश सड़मेक,सूर्यकांत आत्राम,मुन्ना वेलादी,पाटील श्री.मूत्ता पोरतेट,रमेश पोरतेट,दिपक अर्का,राकेश तलांडे, राकेश सड़मेक,शंकर सिडाम,आनंद वेलादी,मनोज सिडाम,महेश सिडाम,दिवाकर आत्राम,नर्सया मुद्रकोल,जी.के.मडावी,बी.वाय,
सोयाम,शारदा आलाम,यमुना आत्राम,लक्ष्मी अर्का,रेखा मडावी,विजया कुमरे,आदि गावातील महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here