Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*अहेरी एसटी आगारात जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन*

*अहेरी एसटी आगारात जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन*

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा श्री अजय कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत*


अहेरी : एस.टी.महामंडळाच्या अहेरी आगारात एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेतर्फे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविस नेते अजय कंकडलावार होते.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते बिरसा मुंडा,वीर बाबुराव शेडमाके तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून त्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती,अहेरी आगार अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार म्हणाले.संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित एस.टी.कर्मचाऱ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एसटी कर्मचारी उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज